मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची घणाघाती टीका

| Updated on: Aug 02, 2022 | 5:28 PM

कॅबिनेटमध्ये या दोघांची बैठक चालू असताना 45 खुर्च्या यांच्याकडे पाहत असतात, त्यामुळे त्याचा ताणही या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे असतो असंही त्यांनी सांगितले. 

बंडखोरी नाट्यानंतर शिंदे गटातील सर्वच आमदारांना मंत्रिमपदाची ऑफर देण्यात आली, त्यानंतर आता मंत्रिपद नेमकं द्यायचे कोणाल असा प्रश्न असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. बंडखोरी झाली त्यावेळी अनेकांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली, त्यावेळी प्रत्येक आमदारालाही आपण मंत्री होऊ असं वाटत असल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडले असल्याचे सांगितले. राज्यात सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही त्यामुळे राज्यातील विकास कामं रखडले असल्याचेही त्यांनी सांगितले.  कॅबिनेटमध्ये या दोघांची बैठक चालू असताना 45 खुर्च्या यांच्याकडे पाहत असतात, त्यामुळे त्याचा ताणही या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे असतो असंही त्यांनी सांगितले.

Published on: Aug 02, 2022 05:28 PM
शिंदे गटातील खासदार राहुले शेवाळेंनी घेतली अमित शाहंची भेट
भाजप विरोधात रणनीती घेण्याबाबत नाना पटोले सांगतात