‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगल्याबाहेर झळकले बॅनर!
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसरात अजित पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत. अजित पवार यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू आहे. अनेकवेळा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर पाहायला मिळतात. दरम्यान आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या २२ जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरात अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहे. “जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार”, असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. सलीम सारंग यांनी हे बॅनर लावलं आहे.
Published on: Jul 21, 2023 12:17 PM