Ajit Pawar | दोन-चार दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता : अजित पवार
असं असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे हे नुकसानग्रस्त पिकांचा पाहणी दौरा करत आहेत.
बीड – संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे दरम्यान यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारंवार राऊतांकडे ईडी का येतं आहे. याचे उत्तर तेच देऊ शकतील असं पवार म्हणालेत, अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करणार आहेत. दरम्यान परळीतील वैद्यनाथाचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्यास सुरुवात केलीय. मागील काही दिवसात गोगलगाय अन्य किडीच्या प्रादुर्भाव असून सोयाबीन सह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. असं असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे हे नुकसानग्रस्त पिकांचा पाहणी दौरा करत आहेत.
Published on: Jul 31, 2022 11:47 AM