निधी वाटपावरून संजय शिरसाटांचे अजित पवारांवर टीका
महाविकास आघाडीचे सरकार असताना जो निधी वाटप करण्यात आला त्यामध्ये निश्चित दुजेभाव झाला आहे, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने हा निधी थांबवला असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडीने मंजूर केलेली काम थांबवण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला असल्याची टीका अजित पवार यांनी केली. त्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी उलट विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका केली आहे. त्यांनी यावेळी अजित पवारांवर टीका करताना म्हणाले की, अजित पवार यांच्यासारख्या माणसांनी तरी अशी बेजबाबदार वक्तव्य करु नयेत कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असताना जो निधी वाटप करण्यात आला त्यामध्ये निश्चित दुजेभाव झाला आहे, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने हा निधी थांबवला असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले.
Published on: Jul 25, 2022 08:53 PM