“अनेक वर्षांपासून मुंबई काबीज करण्याची भाजपची इच्छा”, महापालिका निवडणुकीवरून अजित पवारांची टीका
मुंबई महापालिका निवडणुकीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. "कुठलाही राजकीय पक्ष म्हटले की, ते निवडणुकीच्या तयारीला लागतात. भाजप केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्ष आहे. तसेही अनेक वर्षांपासून मुंबई काबीज करण्याची त्यांची इच्छा आहे.
नागपूर : मुंबई महापालिका निवडणुकीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. “कुठलाही राजकीय पक्ष म्हटले की, ते निवडणुकीच्या तयारीला लागतात. भाजप केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्ष आहे. तसेही अनेक वर्षांपासून मुंबई काबीज करण्याची त्यांची इच्छा आहे. ज्यावेळी शिवसेना निवडून आली त्यानंतर त्यांनी महानगरपालिका ताब्यात घेतली. मुंबई महानगरपालिकेचे बजेट हे अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे, भाजप शिवसेना मागील वेळी एकत्र होते. त्यावेळी महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले होते, पण त्यावेळी जनतेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कौल दिला होता. आताच वातावरण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती आहे. येणाऱ्या सर्वेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा दाखवत आहेत. केंद्रातले भाजपचे मंत्री मुंबईत येऊन दौरे करत आहे. आपला पक्ष वाढवावा स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असावं हे प्रत्येकाला वाटत, त्यामुळे हे चालले आहे. मुंबई शहारात राष्ट्रवादीचे कमी आमदार आणि नगरसेवक निवडून येतात. उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीला एकत्र सामोरे जावू. यावर उद्धव ठाकरे यांनी नाही म्हटलं नाही तर एकत्र बसून विचार करू असं सांगितलं आहे”, असे अजित पवार म्हणाले.