Pune Ajit Pawar : राज ठाकरेंची सर्व आंदोलनं फेल अन् समाजासाठी नुकसानकारक, पुण्यात अजित पवारांची सडकून टीका
फुकटची प्रसिद्धी आणि त्याचा हव्यास काही राजकारण्यांना हवा असतो. कारण लाखो, करोडो रुपये खर्च करून तो मिळत नाही, अशी टीका राज ठाकरेंवर त्यांनी केली. लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले.
पुणे : माध्यमांनी राज ठाकरे (Raj Thackeray) इथून निघाले, तिथे पोहोचले, स्टेजकडे यायला लागले अशा प्रचारचे कव्हरेज दिले पण त्यांनी केलेले एकही आंदोलन यशस्वी झालेले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी टीका करत समाचार घेतला. ते म्हणाले, की मागे राज ठाकरे टोलविरोधात (Toll) आंदोलन करणार म्हणाले. पण एक दिवस फक्त टोल नाक्यावर जमले. पुढे काय झाले? राज ठाकरेंची सगळी आंदोलने राज्याला आणि समाजाला नुकसानकारक ठरली. परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केले, टॅक्सीवाल्यांना मारले, पण फेल गेले. नितीन गडकरी म्हणाले होते, की टोलमुळेच अनेक रस्त्यांची कामे झाली. मग टोल बंद केले तर कामे कशी होणार, असा सवाल त्यांनी केला.
Published on: May 06, 2022 04:51 PM