मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर, अजित पवार गटाला मिळणार ‘ही’ दोन मंत्रिपद!

| Updated on: Jul 13, 2023 | 11:58 AM

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असल्याची आशा सर्वांना होती, मात्र पावसाळी अधिवेयसनानंतरच विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळविस्ताराच्या संदर्भात राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असल्याची आशा सर्वांना होती, मात्र पावसाळी अधिवेयशनानंतरच विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळविस्ताराच्या संदर्भात राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच अजित पवार गटाला दोन मोठी खाती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थखातं आणि महसूल खात अजित पवार यांच्याचकडे जाणार असल्याची माहिती आहे.अर्थखातं आपल्याकडे राहावं अशी आग्रही भूमिका अजित पवार यांची आहे. तसा प्रस्ताव त्यांनी भाजपसमोरही मांडला. भाजपला तो मान्य असल्याची माहिती आहे. पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा अर्थ खातं अजित पवार यांना देण्यास कडाडून विरोध आहे.

 

Published on: Jul 13, 2023 11:50 AM
‘लोक शिंदे, अजित पवार गटासह भाजपला विटलेत’; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
विरोधीपक्ष नेते पदावरील काँग्रेसच्या दाव्याने महाविकास आघाडीत धुसफूस का?