Special Report | शरद पवार यांच्या सभेला अजित पवार प्रत्युत्तर देणार? काका-पुतण्यात राजकारणावरून संघर्षाला धार?
शरद पवार यांनी बीडमध्ये जाहिर सभा घेतली. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील ही पहिलीच सभा. यातून शरद पवार यांच्या गटातील अनेक नेत्यांनी थेट धनंजय मुंडे यांचा समाचार घेत त्यांना टार्गेट केलं. पण आता...
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवार आता जोमात तयारीला लागले आहेत. तर ज्यांनी पक्षाशी आणि त्यांच्याशी गद्दारी केली त्यांचा ते समाचार घेत आहेत. ज्यांनी ज्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला अशांच्या मतदार संघात जाऊन थेट हल्लाबोल करत आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर असणारे नेते देखील त्या त्या आमदारांना टार्गेट करत आहेत. याच्याआधी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना त्यांच्या बंडखोरीवर शरद पवार यांनी ऐकवलं होतं. तसेच आता शरद पवार यांनी बीडमध्ये जाहिर सभा घेतली. आणि थेट धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. मात्र त्यांच्याआधी शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी त्यांना टार्गेट केलं. तर जितेंद्र आव्हाड यांनी मुंडे यांचा भर कार्यक्रमात पळपुट्या असा उल्लेख केला. यानंतर आता बीडमध्ये अजित पवार गटाची २७ तारखेला प्रत्युत्तर सभा होणार आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार गटात चांगला संघर्ष होण्याची शक्यता आहे. तर राजकारणामुळे काका-पुतण्यात संघर्षाची धार अधिक होईल त्यावर हा स्पेशल रिपोर्ट