Ajit Pawar On Navneet Ravi Rana | अजित दादांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला

| Updated on: Apr 25, 2022 | 11:35 PM

हनुमान चालिसा पठणासाठी तुमचं घर नाही का? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था का बिघडवता? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारलाय. मुंबईत बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्मया उपस्थितीत पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार नवनित राणा आणि आमदार रवी राणा आणि भाजप नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवत आहेत. राणा दाम्पत्याने तर दोन दिवसांपासून हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची चांगलीच कोंडी केलीय. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. ‘मातोश्री बाहेरच हनुमान चालिसा म्हणायचा अट्टाहास का? असा सवाल अजित पवार यांनी केलाय. हनुमान चालिसा पठणासाठी तुमचं घर नाही का? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था का बिघडवता? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारलाय. मुंबईत बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्मया उपस्थितीत पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

Published on: Apr 25, 2022 11:34 PM
Special Report | राष्ट्रपती राजवटीची चर्चा…किस्से..टोले-प्रतिटोले-tv9
Sadabhau Khot On Amol Mitkari | अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या फडातील नाचा- सदाभाऊ खोत