अजित पवार यांनी राऊत यांना पुन्हा डिवचलं; टोमना ही मारला, म्हणाले, ‘जास्तच प्रेम उतू चाललय’
अजित पवार यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी किती लोक सामाना वाचतात असा सवालच संजय राऊत यांना केला आहे. सध्या त्यांच्या या प्रश्नावरून राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या सर्व घडामोडींवर उद्धव गटाने ‘सामना’ या मुखपत्रातून भाष्य करण्यात आलं होतं.
त्यावरून अजित पवार यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी किती लोक सामाना वाचतात असा सवालच संजय राऊत यांना केला आहे. सध्या त्यांच्या या प्रश्नावरून राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सामानातून आलेल्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येक दैनिकाच्या संपादकाचा अग्रलेख लिहण्याचा अधिकार आहे. हा त्यांचा अधिकार आहे. तर राऊत यांना जे वाटलं ते त्यांनी लिहलं. त्यामुळं आमच्या अंगाला भोकं ही पडली नाहीत. तर तो वाचतात किती जन? आम्ही फक्त त्याकडे शिवसेनेचं मुखपत्र म्हणून पाहतो.