Ajit Pawar | सोशल मीडियावर अनेक धर्मवीर, अनेकांना धर्मवीर उपाधी दिली
सध्या छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणा असे म्हटलं जात आहे. पण काहींनी ही पदवी लावून घेतली आहे. तर काहींचे चित्रपट ही निघाले आहेत. तर धर्मवीर 2 ही निघणार आहे. त्यामुळे सध्या नेमकं काय सुरू आहे हेच कळत नाही.
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापलं. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. तर त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण आपल्या मतावर ठाम आहे असं म्हटलं. तसेच आपण कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, असेही ते म्हणाले.
तर तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा स्वतंत्र्य अधिकार असतो, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. याबरोबर या पत्रकार परिषदेत त्यांनी सोशल मीडियाचा दाखला देत जवळ जवळ 7 ते 8 लोकांनी स्वत: धर्मवीर ही उपाधी दिल्याचे सांगितलं.
तसेच ते म्हणाले सध्या छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणा असे म्हटलं जात आहे. पण काहींनी ही पदवी लावून घेतली आहे. तर काहींचे चित्रपट ही निघाले आहेत. तर धर्मवीर 2 ही निघणार आहे. त्यामुळे सध्या नेमकं काय सुरू आहे हेच कळत नाही. आणि जर तुम्हीच जर छत्रपती संभाजी महाराजांनाच फक्त धर्मवीर म्हणत असाल तर तशी दुसरी व्यक्ती होऊच शकत नाही असेही ते म्हणाले.