गुप्त बैठक चोरडीया यांच्या घरी का? अजित पवार म्हणतात, ‘म्हणून आम्ही तिथे गेलो…’

| Updated on: Aug 15, 2023 | 1:43 PM

ही भेट उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या घरी घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. तर यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अशी भेट उद्योगपती चोरडीया याच्याच घरी कशी होते? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी कोल्हापूरात या भेटीवरून अखेर पडदा उठवला.

कोल्हापूर, 15 ऑगस्ट 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. ही भेट उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या घरी घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. तर यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अशी भेट उद्योगपती चोरडीया याच्याच घरी कशी होते? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी कोल्हापूरात या भेटीवरून अखेर पडदा उठवला. यावेळी त्यांनी, पुण्यातील भेटीला कोणीही वेगळं वळण देऊ नये असं सांगताना ही भेट कौटुंबिक होती. त्यामुळे त्यात राजकारण आणू नये. त्यातून कोणताही संभ्रम निर्माण करु नका असे म्हटलं आहे. तर उद्योगपती चोरडीया यांच्याच घरी ही बैठक का? यावरही त्यांनी खुलासा करताना, चोरडीया यांचे वडील हे शरद पवार यांचे वर्गमित्र होते. त्यादिवशी त्यांनी जेवायला बोलावलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो. ते आटोपून मी निघून गेलो असं ते म्हणाले आहेत. तर त्यावेळी तेथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही होते असंही ते म्हणालेत.

Published on: Aug 15, 2023 01:43 PM
Ajit Pawar : ‘मी लपून गेलेलो तू पाहिलं का? कधी बाहेर पडायचं…’; प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच अजित पवार भडकले
‘आमचा संसार सुखाचा, आमची काळजी त्यांनी करण्याची गरज नाही’; पटोले यांच्यावर कोणी केलीय खरमरित टीका