राष्ट्रवादीत काका पुतण्यात रस्सी खेच वाढली? 53 पैकी किती आमदार कोणाकडे? धक्का कोणाला?
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पक्ष ताब्यात घेण्यावर रस्सी खेच पहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून बैठक बोलावली आहे.
मुंबई : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनेक बदल होत आहेत. सध्या राष्ट्रवादीत दोन गट तयार झालेले तर एक म्यान आणि दोन तलवारी असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पक्ष ताब्यात घेण्यावर रस्सी खेच पहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून बैठक बोलावली आहे. तर दोन्ही गटाकडून कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदारांनी या बैठकीला हजर राहण्याचे आवाहन करत व्हीप बजावण्यात आला आहे. मात्र आता दुसरी बाजू समोर आली असून अजित पवार याचं पारडं जड होताना दिसत आहे. अजित पवार यांना आतापर्यंत 44 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. तर फक्त 11 आमदार हे शरद पवार यांच्या बाजूने राहिले आहेत. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Published on: Jul 05, 2023 11:24 AM