Ajit Pawar | दर्शन घेतलं तरी टीका, नाही घेतलं तर नास्तिक म्हणतात : अजित पवार

| Updated on: May 27, 2022 | 8:33 PM

काहीजण बाहेरुनच दर्शन घेतात, नाही गेलं तर म्हणतात, नास्तिक आहेत आणि गेलं तरी अडचण. मात्र बाहेरुन नमस्कार करायला काय अडचण आहे, असा प्रतिप्रश्नच त्यांनी उपस्थित अजितदादा यांनी केला आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र, पवारांनी बाप्पाचं दर्शन बाहेरुनच घेतल्यानं पुन्हा एकदा चर्चेला ऊत आलाय. मात्र, पवार यांनी मांसाहार (Non Veg) केल्यानं ते मंदिरात गेले नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं. त्यानंतर यावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे. तर भाजसहीत अनेकांनी शरद पवार यांच्या या कृतीवर टीका केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. शरद पवारांच्या या बाहेरुन दर्शनाबाबत जेव्हा अजित पवारांना विचारणा करण्यात आली, तेव्हा ते म्हणाले मंदिरात गेलं तरी प्रॉब्लेम आणि नाही गेलं तरी. संविधानाने कुठंही जाण्याचा अधिकार दिला आहे. काहीजण बाहेरुनच दर्शन घेतात, नाही गेलं तर म्हणतात, नास्तिक आहेत आणि गेलं तरी अडचण. मात्र बाहेरुन नमस्कार करायला काय अडचण आहे, असा प्रतिप्रश्नच त्यांनी उपस्थित अजितदादा यांनी केला आहे.

Published on: May 27, 2022 08:33 PM
Tushar Bhosale on Sharad Pawar | दगडूशेठ गणपतीला जायचं होतं तरी शरद पवारांनी नॉनव्हेज खाललं
राणा दाम्पत्य उद्या Nagpur मध्ये हनुमान चालिसा वाचणार, अटी शर्थीसह पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली