पोटनिवडणुकीसाठी अजित पवार मैदानात, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना
विरोधी पक्षनेते अजित पवार कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पुण्यात आहेत. आज ते चिंचवड आणि कसब्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. पाहा...
पुणे : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीही जोरदार तयारी करत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पुण्यात आहेत. आज ते चिंचवड आणि कसब्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. अजित पवार आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. अजित पवार कार्यकर्त्यांना बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे अजित पवार आज पुणे आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.
Published on: Feb 09, 2023 12:37 PM