धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात योग्य उपचार सुरू : अजित पवार
अजित पवार यांनी तेथे जात आज त्यांची विचारपूस केली. तसेच त्याच्यांवर योग्य उपचार सुरू आहेत. तर त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचीही माहिती पवार यांनी दिली.
मुंबई : धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात भरती करण्यात आलं. धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. त्यानंतर दक्षता म्हणून त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ब्रीच कॅन्डी रूग्णालयात जात मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंडे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या कारला काल परळीतील आझाद चौकात मध्यरात्री अपघात झाला होता. ते किरळोक जखमी झाले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात हलवण्यात आले होते.
यादरम्यान अजित पवार यांनी तेथे जात आज त्यांची विचारपूस केली. तसेच त्याच्यांवर योग्य उपचार सुरू आहेत. तर त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचीही माहिती पवार यांनी दिली