काँग्रेसच्या दाव्यावर शरद पवार म्हणतात, ‘त्यांची मागणी असेल तर…’
तर राष्ट्रवादीवर आपला दावा सांगत येणाऱ्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र लढणार अशी घोषणाच केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीची विधानसभेतील ताकद कमी झाल्याने विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे.
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समिल होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. तर राष्ट्रवादीवर आपला दावा सांगत येणाऱ्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र लढणार अशी घोषणाच केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीची विधानसभेतील ताकद कमी झाल्याने विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यावरूनही आता छोटा मोठा भाऊ अशी लागल्याचे पहायला मिळत आहे. यावरूनच शरद पवार यांना काँग्रेसने केलेल्या दाव्यावरून विचारले असता त्यांनी, ज्यांच्याकडे विधानसभेचे जास्त सदस्य त्यांचाच नेता. त्याप्रमाणे सध्याच्या घडीला काँग्रेस पक्षाकडे सर्वात जास्त विधानसभेचे आमदार आहेत. त्यामुळे ते जर तशी मागणी करत असतील तर त्यात गैर काय? त्यांचा दावा रास्त असल्याचेही शरद पवार म्हणाले. maharashtra politics