Maharashtra Politics : “सध्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री टेरर” ; काँग्रेसच्या नेत्यानं असं का व्यक्त केलं मत?

| Updated on: Jul 03, 2023 | 2:40 PM

याच धक्क्यावरून आता काँग्रेसह सह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलेल्या राजकीय भूकंपाचे धक्के महाविकास आघाडीतही जाणवत आहेत. याच धक्क्यावरून आता काँग्रेसह सह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादीतील फूट ही अपेक्षित होती, अनेकांना माहित होतं की अजित पवार यांचे भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू होते. तर त्यांना समजविण्याचा प्रयत्न सुरू शरद पवार करत होते. पण अजित पवार तयार नव्हते आणि त्यांनी शेवटी सरकारमध्ये प्रवेश केलाच. पण आता या सरकारमध्ये दोन टेरर आले आहेत. कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आपल्या कामात हट्टी आहेत. तर या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री करण्याचे नेमकं कारण काय असा सवाल करताना, कदाचित आता भाजपच्या मनात फडणवीस यांचे राजकीय वजन कमी करण्याचे दिसत असल्याच्या चर्चा सध्या सुरू असल्याचंही ते म्हणालेत.

Published on: Jul 03, 2023 02:39 PM
“शरद पवार यांच्या सहमतीने अजितदादाचं बंड”, पाहा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
Ajit pawar news: “शरद पवार आमचे भीष्मपितामह, आमचा पक्ष फुटला नाही”, अमोल मिटकरी यांचं सूचक विधान