‘सदाभाऊ खोत यांच्या त्या टीकेला राष्ट्रवादी नेत्याचा खरमरीत इशारा, म्हणाला ‘खपवून घेणार नाही’

| Updated on: Jul 10, 2023 | 8:27 AM

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी शब्दांत टीका केली होती. त्यांनी, पूर्वी बापाने पाप केले की ते मुलाला फेडावं लागत होतं. पण, कलयुगात जो पाप करतो, त्यालाच फेडावं लागतं. पवारांना आता हे पाप फेडावं लागणार आहेत. तर भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका केली होती.

मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र भर फिरणार आहेत. त्यांनी याची सुरूवात नाशिकमधून केली. तर येवला येथे सभा घेत बंडखोरांवर टीका केली. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी शब्दांत टीका केली होती. त्यांनी, पूर्वी बापाने पाप केले की ते मुलाला फेडावं लागत होतं. पण, कलयुगात जो पाप करतो, त्यालाच फेडावं लागतं. पवारांना आता हे पाप फेडावं लागणार आहेत. तर भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका केली होती. त्यावरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यावरून खोत यांचा समाचार घेताना त्यांना इशारा दिला आहे. यावेळी चव्हाण यांनी, सदाभाऊंनी आपल्या जिभेवरती ताबा ठेवावा. कारण पवार साहेबांपासून आम्ही बाजूला झालो जरी असलो तरी आजही ते आमचं दैवत आहेत. आणि आमच्या दैवतावरती केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही. सदाभाऊंनी जे काय बोलायचे ते इतरांवरती बोलावं. पवार साहेबांवर बोलण्याची हिंमत करू नये आपली उंची पाहून त्यांनी बोलावं असा टोला लगावला आहे.

Published on: Jul 10, 2023 08:27 AM
“…तर राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती?” उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा खरा ठरणार का? राष्ट्रवादीचा नेत्याचा मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘अजितदादांना मुख्यमंत्री…’