बाबा रामदेवांमुळे माझे सगळे केस गेले- अजित पवार

बाबा रामदेवांमुळे माझे सगळे केस गेले- अजित पवार

| Updated on: Feb 07, 2023 | 7:40 AM

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या केसगळतीवर भाष्य केलंय. यावेळी बोलताना त्यांनी रामदेवबाबांच्या टिप्सवरही बोट ठेवलंय.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या केसगळतीवर भाष्य केलंय. यावेळी बोलताना त्यांनी रामदेवबाबांच्या टिप्सवरही बोट ठेवलंय. “बाबा रामदेव यांनी नखावर नखं घासायला सांगितली. रामदेव बाबा यांचा हा सल्ला फार मनावर घेऊ नका. मी तसंच केलं. त्यामुळे माझे केस गेले. परत नव्याने येणं तर सोडाच पण होते ते पण गेले”, असं अजित पवार म्हणाले. शिवाय बाबा बुवांचं फार ऐकू नका. महापुरुषांचं ऐका पण या बाबाबुवांना सिरियसली घेऊ नका, असं अजित पवार म्हणाले.

Published on: Feb 07, 2023 07:40 AM
अदानी ग्रुपकडून आपला स्वत: चा फायदा कसा करून घ्यायचा हे रोहित पवारांनी सांगितलं, पाहा…
द बर्निंग कार : मुंबईत कारला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदलाकडून प्रयत्न