आम्हाला मंत्री करा म्हणता अन् विधानसभेत गैरहजर राहता, काहीतरी वाटलं पाहिजे…; अजित पवार आक्रमक

| Updated on: Mar 15, 2023 | 12:03 PM

Ajit Pawar : राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती पाहायला मिळततेय. त्यावर अजित पवार भडकले. ते काय म्हणालेत? पाहा...

मुंबई : राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान शिंदे सरकारमधील मंत्र्यांची अनुपस्थिती पाहायला मिळत आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात बोलताना टीका केली आहे. “आधी आम्हाला मंत्री करा म्हणता आणि अधिवेशनादरम्यान विधानसभेत गैरहजर राहतात, हे अत्यंत चुकीचं आहे. काहीतरी वाटलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणालेत. “आज आठ लक्षवेधी सभागृहात मांडल्या जाणार होत्या. पण त्यातल्या सात लक्षवेधी त्या-त्या खात्याचे मंत्री उपस्थित नसल्यामुळे मांडता आल्या नाहीत. त्या लक्षवेधी पुढे ढकलाव्या लागल्या. हे गंभीर आहे”, असंही अजित पवार म्हणालेत.

Published on: Mar 15, 2023 12:01 PM
अमोल मिटकरींचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, या सरकारला…
आमदार खासदारांनी पेन्शन घेता कामा नये, कारण…; बच्चू कडू यांचं लोकप्रतिनिधींना उद्देशून महत्वाचं वक्तव्य