अजित पवारांनी दिली धक्कादाय माहिती; छापलेल्या नोटा परत आरबीआयकडे गेल्याच नाही!

| Updated on: Jun 16, 2023 | 2:22 PM

अजित पवार यांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारला धारेवर घरलं आहे. ते म्हणाले की, "काल मी एक बातमी वाचली, ती खरी आहे की खोटी याचा तपास केला पाहिजे. काही लाख किंवा काही कोटी रुपयांच्या छापलेल्या नोटा या आरबीयआयमध्ये पोहचल्या नाही आहेत, असं महत्वाच्या वृत्तपत्रात ही बातमी आली आहे.

जळगाव: अजित पवार यांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारला धारेवर घरलं आहे. ते म्हणाले की, “काल मी एक बातमी वाचली, ती खरी आहे की खोटी याचा तपास केला पाहिजे. काही लाख किंवा काही कोटी रुपयांच्या छापलेल्या नोटा या आरबीयआयमध्ये पोहचल्या नाही आहेत, असं महत्वाच्या वृत्तपत्रात ही बातमी आली आहे. यामध्ये अर्थखात्याने हस्तक्षेप करून लोकांच्या शंका दूर करायला हव्या. 2016 मध्ये काळापैसा बाहेर काढण्यासाठी 500, 1000 च्या नोटा बंद केल्या इथवर ठीक आहे. पण आता पुन्हा 2000 ची नोट रद्द करता. हे जे काय चाललं आहे,ही काय चेष्ठा आहे का? या बातमीत काय तथ्य आहे ते केंद्र सरकारने सांगावं, मागच्यावेळी नोटबंदी केली तेव्हा किती काळा पैसा बाहेर आला तेही या सरकारने सांगावं.”

Published on: Jun 16, 2023 02:20 PM
‘आमच्यात सारं आलबेल, संजय राऊत यांनी नाक खुपसू नये’, भाजप नेत्याचा इशारा
इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार? ‘त्या’ वक्तव्यावरून कोर्टानं दिले ‘हे’ आदेश