महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू; अजित पवार म्हणाले, ‘हे’ चुकलंच

| Updated on: Apr 17, 2023 | 7:57 AM

Ajit Pawar on Maharashtra Bhushan Award ceremony 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमाला गालबोट; 11 श्रीसदस्यांचा मृत्यू तर 24 जणांवर उपचार सुरू. अजित पवार म्हणाले...

नवी मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उष्मघातामुळे 50 हून अधिक श्रीसदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. तर 24 जणांवर नवी मुंबईच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दुपारची वेळ निवडली हेच आयोजकांचं चुकलं. पण आता चूक-बरोबर काय असं आम्ही करणार नाही. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रयत्न करू शकतो”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Published on: Apr 17, 2023 07:49 AM
महाराष्ट्र भूषण सोहळ्यावरून सरकारवर काँग्रेसचा निशाना; केली सरकारवर विरोधात ‘ही’ मागणी
महाराष्ट्र भूषण सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहण, 11 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत