“शिवसेनेची जाहिरात देणारे हितचिंत कोण? कोणी पैसा खर्च केला?” अजित पवार यांचा सवाल
शिवसेनेच्या जाहिरातीमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : शिवसेनेच्या जाहिरातीमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. “कालच्या जाहिरातीमध्ये खोडसाळपणा केला, आज तो दुरुस्त करण्याच काम झालं”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. “कालची जाहिरात एका हितचिंतकाने दिली तो कोण हितचिंतक आहे. असा कोण हितचिंतक मिळाला त्याचं नाव त्यांनी सांगावं. जनतेच्या मनात नक्की काय हे निवडणुका घेतल्यानंतर लक्षात येईल. ज्यांच्या पाठिंब्यावर हे स्वत: मुख्यमंत्री आणि काही मंत्री झाले, त्याच पक्षाला हा खोडसाळपणा वाटतोय. आणि कालचा खोडसाळपणा दूर करण्यासाठी हि जाहीरात आहे का?” असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
Published on: Jun 14, 2023 03:54 PM