पहिला अभिमान वाटला पाहिजे आपण भारतीय आहोत – अजित पवार

| Updated on: Mar 08, 2023 | 9:32 AM

अजित पवार म्हणाले, छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरणावरून कोणाचं दुमत असण्याचे कारण नाही. हा स्थानिक पातळीवरचा भावनिक मुद्दा असतो

मुंबई : सध्या राज्यात औरंगाबादचं नाव छ. संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे करण्यात आले आहे. त्यानंतर छ. संभाजीनगरवरून एमआयएमचे साखळी उपोषण सुरू आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरणावरून कोणाचं दुमत असण्याचे कारण नाही. हा स्थानिक पातळीवरचा भावनिक मुद्दा असतो. त्या भावनिक मुद्याप्रमाणे लोकशाहीत बहुमताचा आदर करून पुढे जायचं असतं. मात्र पुढे जात असताना जाती जाती धर्मा धर्मात अंतर पडेल असं करायचं नसतं. तर पहिला अभिमान वाटला पाहिजे आपण भारतीय आहोत. त्यानंतर महाराष्ट्रीयन असल्याचा बाळगायला हवा.

Published on: Mar 08, 2023 09:32 AM
जातीयवादी पक्षांना रोखण्यास महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग : पृथ्वीराज चव्हाण
पुण्यात पीएमपीएमएल बसमधून महिलांना मोफत प्रवास; जागतिक महिला दिनानिमित्त खास उपक्रम