“राजकीय भूमिका वेगळी, परिवारातील संवाद वेगळा”; टिळक पुरस्कार कार्यक्रमातील घटनेवरून अजित पवार स्पष्टच बोलले…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार हे काल एका मंचावर आले होते. यावेळी शरद पवार यांना समोर बघून अजितदादांनी आपली वाटच बदलली. यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारताच त्यांनी स्पष्टच सांगितलं.
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार हे काल एका मंचावर आले होते. यावेळी शरद पवार यांना समोर बघून अजितदादांनी आपली वाटच बदलली. यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारताच त्यांनी स्पष्टच सांगितलं. ते म्हणाले की, शरद पवार यांचा आदर करतो म्हणून मागून गेलो. कुटुंब म्हणून एकत्र आहोत. मात्र राजकीय भूमिका वेगळी असू शकते. मोदी देशासाठी 18-18 तास काम करतात.देशात मोदींशिवाय अशी व्यक्ती कोणी नाही.
Published on: Aug 02, 2023 07:30 AM