अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकार टीका; म्हणाले, “या सरकारमध्ये भ्रष्टाचार भोकाळलेला”!

| Updated on: Jun 05, 2023 | 8:36 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजावर टीका केली आहे.

नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजावर टीका केली आहे. अनेकदा अधिकारी दबक्या आवाजात बोलतात.सरकार म्हणून जो कणखरपणा असायला हवा, पारदर्शकता हवी तशा पद्धतीने कामं होताना दिसत नाही. भ्रष्टाचार भोकाळलेला आहे. इथं कुठंही वजन ठेवल्याशिवाय काही गोष्टी घडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, हवं असेल तर इतर राष्ट्रीय पक्षातील नेत्यांना विचारा, असं अजित पवार म्हणाले.

Published on: Jun 05, 2023 08:36 AM
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारीत व्यस्त”, नाना पटोले यांचा निशाणा
काल गरम, मग आज नरम का? थुंकण्यावरुन झालेला वाद संजय राऊत यांच्यावर उलटला का?