दसरा मेळाव्याचा खरा मान बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच; अजित पवार
भाजपकडून बारामती मतदार संघासाठी मोर्चेबांधणी करण्याचे काम सुरु केले आहे, त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपच्या त्यांच्या कामाला आमच्या शुभेच्छा असल्याचे सांगत निवडणुकांसाठी भाजप पक्षालाही त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
पुण्यातील गणेश विसर्जनदिवशीच मानाच्या गणपतींचे दर्शन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सरकार काय मदत जाहीर करणार याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत सांगितले की दसरा मेळाव्याचा खरा मान हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनाचा असून त्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचेच आहे. त्यामुळे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याचा शिवसैनिक साथ देतील ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजपकडून बारामती मतदार संघासाठी मोर्चेबांधणी करण्याचे काम सुरु केले आहे, त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपच्या त्यांच्या कामाला आमच्या शुभेच्छा असल्याचे सांगत भाजप पक्षालाही त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.