Ajit Pawar : सध्या आमची परिस्थिती नाही, पण.. ; लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजितदादा स्पष्टच बोलेले

| Updated on: Mar 20, 2025 | 6:32 PM

Ajit Pawar In Assembly Session : राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत असताना आज विधिमंडळाच्या अधिवेशनात अजित पवार यांनी यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवर आणि लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांवर निवेदन केलं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी द्यायचे याबद्दल आम्ही निर्णय घेऊ. पैसे देणार नाही असं आम्ही म्हंटलेलं नाही. पण एकंदरीतच आर्थिक परिस्थिती बघून आम्ही ते देऊ. सगळे सोंग आणता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नाही. त्यापद्धतीने आमचं काम चाललं आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातल्या शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या आम्ही याबद्दल माहिती गोळा करत आहे. ते काम पूर्ण झालेलं नाही. माहिती गोळा झाली की त्यावर निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

Published on: Mar 20, 2025 06:32 PM
दिशा सालियन प्रकरणावरून जुंपली, ‘सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला’, अनिल परबांचा मनिषा कायंदेंवर निशाणा
Nagpur Updates : 2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची परिस्थिती?