‘त्यांची मनघडण कहाणी’, राऊत यांच्यावर शिवसेना आमदार भडकला? अर्थ खात्यावरही केलं सुचक वक्तव्य
तर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत प्रवेश केल्याने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि इतर ८ नेत्यांचा शपथविधी पार पडला. यावरून शिंदे गटातील अनेक आमदार नाराज दिसत आहेत.
बुलढाणा : गेल्या वर्षभारापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. मात्र या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आमदारांना स्थान देण्यात आलं नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत प्रवेश केल्याने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि इतर ८ नेत्यांचा शपथविधी पार पडला. यावरून शिंदे गटातील अनेक आमदार नाराज दिसत आहेत. हिच नाराजी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट बोलून दाखवली. यावेळी गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देताना हा विषय आता खूप पांचट झाला असून संपला पाहिजे असं बोलत मनातील खंत बोलून दाखवली आहे. याचबरोबर त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अर्थ खात्यावरून केलेल्या वक्तव्यावरून टीका केली आहे. राऊत यांनी, अर्थ खाते अजित पवारांकडे जायचं नसल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं दिल्ली हाय कमांड ने सांगितल्यानंतर शिंदे गटाने त्यामध्ये माघार घेतली असं म्हटलं होतं. त्यावरून टीका करताना, राऊत यांची मनघडण कहाणी असते असा टोला गायकवाड यांनी लगावला आहे. तर राज्यामध्ये अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, आणि देवेंद्र फडणवीस हे तिघेच अर्थ खातं सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, हे तिघेही भारी आहेत आणि सरकारही भारी चालवणार असं त्यांनी म्हटलं आहे.