सरकार आठ महिने… म्हणत अजित पवारांनी सभागृहातच वाचला पाढा

| Updated on: Mar 14, 2023 | 7:17 AM

अजित पवार यांनी सडकून टीका करत सरकार आठ महिने काय करत होतं याचा पाढाच वाचला. हे सरकार आठ महिने फक्त राजकारणात रंगलेलं होतं, असं अजित पवार यांनी म्हणत सरकारवर निशाण साधला.

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे आहे असं सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत असतात. यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका करत सरकार आठ महिने काय करत होतं याचा पाढाच वाचला. हे सरकार आठ महिने फक्त राजकारणात रंगलेलं होतं, असं अजित पवार यांनी म्हणत सरकारवर निशाण साधला. सरकारवर गंभीर आरोप करताना, शासकीय कामांकडे सरकारचं लक्ष नव्हतं. सत्ता टिकवणे, त्यातल्या त्यात शिंदे गटातील 40 आमदारांना सांभाळणं, आणखी आमदारांना फोडणं, दुसऱ्या गटातील आमदारांवर वर्चस्व निर्माण करणं, विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेत्यांवर गुन्हे दाखल करणे, विरोधी आमदारांच्या मतदारसंघातल्या कामांना स्थगिती देणे, निधी रोखणं, सत्कार समारंभ आणि देवदर्शन करणं यातच हे सरकार आठ महिने होतं. हे सरकार यात रंगत राज्याला मात्र वाऱ्यावर सोडलं असा घणाघात अजित पवार यांनी केला.

Published on: Mar 14, 2023 07:17 AM
कांदा, अब्दुल सत्तार अन् लाल वादळ; दिवसभरातील चर्चेच्या विषयांवरचा बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
पूजेला 7 मिनिटांचा उशीर अन् पुजाऱ्यांना थेट कारणे दाखवा नोटीस; पाहा नेमका वाद काय?