“रोहित पवार यांचं आंदोलन उचित नाही”, अजित पवार संतापले; विधानसभेत मांडली भूमिका!

| Updated on: Jul 24, 2023 | 2:09 PM

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या मुद्द्यावरून आज काका अजित पवार पुतण्या रोहित पवारांवर नाराज झाल्याचं दिसून आलं. यासंदर्भात अजित पवारांनी अधिवेशनात आपली भूमिका मांडली.

मुंबई, 24 जुलै 2023 | कर्जत जामखेडमधील युवकांचा रोजगार आणि स्थानिकांचे प्रश्न यासंदर्भात रोहित पवार यांचं उपोषण केलं. यानंतर कर्जत जामखेड MIDC प्रश्नी मंगळवारी बैठकीचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिल्यानंतर रोहित पवारांनी विधानभवनातले शिवरायांच्या पुतळ्याजवळ सुरु केलेलं आंदोलन मागे घेतले. यादरम्यान विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख रोहित पवारांची बाजू विधानसभेत मांडत होते. “रोहित पवारांनी एमआयडीसीच्या स्थापनेची मागणी गेल्या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. तेव्हा उदय सामंतांनी अधिवेशन संपण्याआधी अध्यादेश काढण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आता दुसरं अधिवेशन आलं. तरी अजूनही तो आदेश निघालेला नाही. त्या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. त्याची शासनानं दखल घ्यावी”, असं अनिल देशमुख म्हणाले. या मुद्द्यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

Published on: Jul 24, 2023 02:09 PM
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर असाल तर महत्वाची बातमी; प्रवासा दरम्यान खाणं आणि पिण्यासाठी पाणी सोबत घ्याच
निधी वाटपाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस भडकले; म्हणाले, ‘हा शहाणपणा तेव्हाच्या सरकारला शिकवायला हवा होता’