एसटी कर्मचाऱ्यांना काही लोकांनी भडकावण्याचा प्रयत्न केला, अजित पवारांचा आरोप

| Updated on: Apr 08, 2022 | 11:52 PM

चिथावणी खोर भाषण कोण देतो हे सर्वांनी पाहिलंय आणि न्यायालयाच्या निकालाची तंतोतंत अंमलबजावणी होईल असं सरकारने सांगितले होतं, मग अचानक हे आंदोलन कसासाठी झालं? एवढं धाडसं येतं कुठून? या आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधून काढू, असा इशाराच अजित पवार यांनी दिलाय.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्तेंचे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशावेळी राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. चिथावणी खोर भाषण कोण देतो हे सर्वांनी पाहिलंय आणि न्यायालयाच्या निकालाची तंतोतंत अंमलबजावणी होईल असं सरकारने सांगितले होतं, मग अचानक हे आंदोलन कसासाठी झालं? एवढं धाडसं येतं कुठून? या आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधून काढू, असा इशाराच अजित पवार यांनी दिलाय.

अजित पवार काय म्हणाले?

पवार साहेबांच्या कामाची पद्धत सर्वांना माहीत आहे. एवढे मोठे धाडस करण्यामागे नक्की कोणतरी मास्टर माईंड असला पाहिजे. त्याला शोधून काढू. हे कुणाच्याच बाबतीत घडता कामा नये. याच्या शेवट पर्यंत जाऊन महाराष्ट्रात दूध का दूध पानी का पानी करू, असा थेट इशारा अजित पवारांनी दिला आहे. तसेच हे पोलिसांचेही एकप्रकारे अपयश आहे. इतरांना याची माहिती असली पाहिजे. पोलीस यंत्रणेला याची माहिती असायला हवी होती. 12 तारखेला आंदोलन करणार असं काहीजण बोलेल होते, असे म्हणत त्यांनी पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत.

आमच्या जीवाला धोका, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा गंभीर आरोप
एसटी कामगारांच्या नावावर भाजप राजकीय पोळी भाजतंय – यशोमती ठाकूर