Ajit Pawar : ठाकरे सरकारच्या काळात अजित पवारही होते नाराज, नेमकी ‘ती’ खदखद काय?
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देखील ठाकरे सरकारच्या काळात आपल्या मनात काय खदखद होती ती आज बोलून दाखवली आहे.
पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात नेमकं काय सुरु होते ते आता अधिक स्पष्टपणे बाहेर येत आहे. आतापर्यंत शिंदे गटातील (Eknath Shinde) आमरादांनी विविध दावे केले होते. पण राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील त्या दरम्यानची खदखद आज बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडी काळात उपमुख्यमंत्री पदाबरोबर आपण गृहखातेही द्या अशी मागणी केल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच एका कार्यक्रमात सांगितले आहे. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की माझ्याकडे गृहखाते आले तर हा कुणाचेच ऐकणार नाही, असे वाटत असणार. त्यामुळे गृहखातं मिळाले नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. जर कोणी चुकले तर मात्र, पोटात नाही आणि व्होटात नाही असे म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला होता. सर्वासाठी एकच नियम केला असता असेही अजित पवार कार्यक्रमात म्हटले आहेत. ही गोष्ट त्यांनी अगदी सहजरित्या सांगितली असली तरी खरोखरच त्यांनी गृहखात्याची मागणी केली होती का? महत्वाचे आहे.