Tv9 Special Report | ‘पवार यांना मी भेटलो, पण तो मी नव्हेच’; अजित पवार याचं त्या भेटीवर स्पष्टीकरण

| Updated on: Aug 16, 2023 | 7:40 AM

त्यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजित पवार यांनी शरद पवार यांना भेटलं टाळलं होतं. मात्र त्यानंतर व्यावसायिक अतुल चोरडीया यांच्या घरी अजित पवार यांनी गुप्त भेट घेतली. त्यानंतर आतापर्यंत याभेटीवरून अने उलट सुलट चर्चा होत आहेत.

मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | चांदणी चौकातल्या उड्डाण पुलाच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि शरद पवार हे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदच एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजित पवार यांनी शरद पवार यांना भेटलं टाळलं होतं. मात्र त्यानंतर व्यावसायिक अतुल चोरडीया यांच्या घरी अजित पवार यांनी गुप्त भेट घेतली. त्यानंतर आतापर्यंत याभेटीवरून अने उलट सुलट चर्चा होत आहेत. तर पवार काका पुतण्यांच्या भेटीवरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याचदरम्यान अजित पवार यांनी कोल्हापुरात ध्वजारोहनानंतर त्याभेटीवर भाष्य केलं आहे. तर आपण ती भेट घेतली मात्र त्या गाडीमध्ये मी नव्हतोच असं अजित पवार म्हणाले. मग अजित पवार नेमकं निघाले तरी कसे? त्यावर हा TV9चा special report

Published on: Aug 16, 2023 07:36 AM
सांगली जिल्ह्याच्या मिरजमध्ये जिल्ह्यातील 100 फूट उंच तिरंगा ध्वज
Tv9 Special Report | दीड वर्षानंतर मलिक बाहेर आले; मात्र भाजपच्या गोची होण्याचे कारण काय?