Ajit Pawar : ‘मी लपून गेलेलो तू पाहिलं का? कधी बाहेर पडायचं…’; प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच अजित पवार भडकले

| Updated on: Aug 15, 2023 | 1:33 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. ही भेट उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या घरी घेतली होती. त्यावरून विविध चर्चां उत आला होता. शरद पवार यांच्याच भूमिकेवर प्रश्न उठवले गेले होते. त्यावरून आज अजित पवार यांनी सडेतोड उत्तरे दिली आहे.

कोल्हापूर, 15 ऑगस्ट 2023 | पुण्यातील चांदणी चौक पूलाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. ही भेट उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या घरी घेतली होती. त्यावरून विविध चर्चां उत आला होता. शरद पवार यांच्याच भूमिकेवर प्रश्न उठवले गेले होते. त्यावरून आज अजित पवार यांनी सडेतोड उत्तरे दिली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना अजित पवार यांनी शरद पवारांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्ट केले आहे. तर मी बैठकीला लपून गेलेलो नाही, मी उघड माथ्यानं फिरणारा कार्यकर्ता आहे. मी उद्या कोणाच्याही घरी गेलो तर तेथून कधी बाहेर पडायचं हा माझा प्रश्न आहे ते मी ठरवणार, असे ते म्हणाले. तर त्यावेळी जी गाडी गेटला धडकली त्यात मी नव्हतो. असे ही ते म्हणालेत. तर याच प्रश्नावरून ते थेट प्रश्नविचारणाऱ्याच पत्रकारावर भडकल्याचे दिसले. यावेळी त्यांनी थेट पत्रकारालाच तू मला कुठ बघितलास लपून जाताना असा सवाल केला.

Published on: Aug 15, 2023 01:29 PM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांचा गोंधळ, एकच खळबळ
गुप्त बैठक चोरडीया यांच्या घरी का? अजित पवार म्हणतात, ‘म्हणून आम्ही तिथे गेलो…’