अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या जागांसंदर्भात खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर
Sanjay Raut On Ajit Pawar : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात वार-पलटवार सुरु झाले आहेत. अशातच आता खासदार संजय राऊत यांनी देखील मोठं विधान केलं आहे. आमच्यासमोर लढायला तयार नाही म्हणून युतीचं जागावाटप रखडलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत असं संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या भाकीतानंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Published on: Apr 20, 2024 07:44 AM