‘चुकीच्या पद्धतीनं केलेल्या बातम्या’, अजित पवार यांच्या त्या सल्यावरून राष्ट्रवादीचा नेत्याचं थेट कोणाला उत्तर

| Updated on: Aug 17, 2023 | 8:37 AM

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या बैठका आणि गाठी भेटीत काही कमी झालेल्या नाहीत. तर उद्योगपतीच्या घरात झालेल्या गुप्त बैठकीने अनेक तर्कवितर्कांना उत आला आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या दुसऱ्या ऑफरचीही चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : 17 ऑगस्ट 2023 | अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे राज्यात अनेक तर्कवितर्कांना उत आला आहे. तर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता. त्यांनी शरद पवार यांना सोबत घ्या असे पंतप्रधान मोदी यांनीच म्हटल्याचे तर त्यासाठी अजित पवार यांनी त्यांची भेट घेतल्याचे म्हटलं होतं. त्यापाठोपाठ आता अजित पवार यांच्या दुसऱ्या ऑफरची सध्या चर्चा होताना दिसत आहे. यावेळी अजित पवार यांनी, शरद पवार यांनी दोन पर्याय दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात शरद पवार सोबत येत नसतील त्यांनी निवृत्ती घ्यावी आणि तटस्थ राहावं. तर दुसरं म्हणजे राष्ट्रवादीची शिवसेनेसारखी अवस्था होऊ नये यासाठी पक्ष एकसंध राहावा हे पाहावं. मात्र शरद पवार यांनी ही ऑफर नाकारली असून ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, या बातमीत काही तथ्य नाही. तर अजित पवार यांनी अशी कोणतीही ऑफर शरद पवार यांना दिलेली नाही, असंही ते म्हणालेत.

Published on: Aug 17, 2023 08:29 AM
राज ठाकरे यांच्या त्या टीकेला अजित पवार गटाच्या नेत्याचा जशाच तसं प्रत्युत्तर; कोहिनूर मिलच्या मुद्द्यावर केली टीका
‘विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतच त्यांनी राहावं, दिल्लीचे एजंट…’; त्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला