धीरगंभीर होणाऱ्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांचा टोला; उपस्थितांमध्ये खसखस पिकली
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तर असे काय घडले की, 100 जणांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे, असा सवाल केला आहे. तर सरकारी खर्चातून या 100 जणांना पोलीस संरक्षण दिले जात असल्याचा मोठा दावाही पवार यांनी केला.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात असं काय घडतयं की 100 लोकांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. यावरूनच सरकार कोणाला का संरक्षण देतय याची माहिती स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात येत आहे. याचवरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तर असे काय घडले की, 100 जणांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे, असा सवाल केला आहे. तर सरकारी खर्चातून या 100 जणांना पोलीस संरक्षण दिले जात असल्याचा मोठा दावाही पवार यांनी केला. याचदरम्यान त्यांनी आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकारकडून ती माहिती दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी ही पत्रकार परिषद गंभीर झाली होती. त्याचवेळी त्यांनी एक टोला लगावला आणि वातावण हास्याचं झालं. अजित पवार यांनी संरक्षण कोणाला दिलं जात आहे त्यांची यादीच समोर ठेवली. तसेच काही नेत्यांच्या पुतण्यांनाही संरक्षण दिलं जात आहे. “पुतण्यांनाही फार महत्व असतं, बरं का” असे म्हटल्याने तेथे एकच हशा पिकला?