अजितदादा मन मोठं करा, ‘त्यांना’ माफ करा, बोललं कोण आणि माफी मागितली कुणी?
गोपीचंद पडळकर यांनी लबाडांची साथ सोडून आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता धनगर समाजाकडून होतेय. याच पडळकर यांनी अजितदादा यांना लांडग्याचं पिल्लू म्हटलं होतं. त्यावरून राज्यात अजित दादा गटाने आंदोलन केलं. पण..
मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | अजितदादांचे मन दुखावलं असेल तर मी स्वतः माफी मागतो. अजित दादांना विनंती करतो की मोठ्या मनाने त्यांना माफ करावं. मी पणं दिलगिरी व्यक्त करतो. ही विधाने आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची. अजितदादा म्हणजे राष्ट्रवादीचे बडे नेतृत्व. देशाच्या राजकारणातील महत्वाचे नेते काका शरद पवार यांना सोडून दादांनी सत्तेसाठी भाजपचा हात धरला. याच दादांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी डिवचलं. राज्यात मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर आलाय. त्यावरुन राज्यात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावेळी बोलताना पडळकर यांनी सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक तर अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू असल्याचं म्हटलं. या वक्तव्यानंतर अजित पवार गटानं राज्यभरात पडळकर यांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं. मात्र, त्यांनी या विधानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त केली नसताना प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनीच माफी मागितली आहे. बोलले कोण आणि माफी मागितली कुणी? पाहू हा एक रिपोर्ट स्पेशल रिपोर्ट…