चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा ?

| Updated on: Oct 05, 2024 | 4:57 PM

अजितदादांनी आपले काका शरद पवार यांची साथ सोडल्यानंतरही त्यांच्यावर तोंडसुख घेण्याची कोणतीही संधी सोडत नाही. शरद पवार यांच्या वयाचा त्यांच्याकडून वारंवार उल्लेख केला जात असतो.

अजितदादा यांनी काका शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आता अजूनही त्यांच्यावर टीका करण्याचे सोडलेले नाही. एका कार्यक्रमात त्यांनी काही जण ऐकत नाहीत, एवढा हट्टीपणा करतात. वय झालं तरी दुसऱ्यावर जबाबदारी देत नाही. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात. पण काही जण आपली जागा सोडायला तयार होत नाहीत, पार सुन म्हातारी होईपर्यंत वाट पाहायची काय ? असाही सवाल अजितदादा पवार यांनी केला आहे. बर आम्ही जे बोलतो ते करतो. एवढे काम केले आहे की असेही अजितदादा यांनी शरद पवार यांचे नाव घेता त्यांना टोमणा मारला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले की अजितदादा नक्की सून आहेत की सासू ? आणि ते सध्या माहेरी आहेत की सासरी अशी मिश्कील टीपण्णी केली आहे.

Published on: Oct 05, 2024 04:56 PM