Akbaruddin Owaisi on Raj Thackeray | राज ठाकरेंवर अकबरुद्दीन ओवैसींची टीका
शाळा सुरू केल्यानंतर केवळ मुस्लिमच नाही तर हिंदूंसाठीही आमची शाळा खुली आहे. आज जर आपण सद्यस्थितीचा सामना करायचा असेल तर केवळ केवळ घोषणाबाजी करून चालत नाही. आजच्या कार्यक्रमामध्ये कोणतही राजकारण नाही. कोणत्याही राजकारणासाठी हे शाळा सुरू करण्याचा कार्यक्रम केला नाही, असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद : राज्यात आधीच मोठा पॉलिटिकल राडा सुरू असताना त्यात आता आणखी एक ठिणगी पडली आहे. कारण एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबादेतून राज ठाकरेंचं (Raj Thackeray) नाव न घेता सडकून टीका केली आहे. ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले तुम्हाला घाबरायाची गरज नाही. जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला आहे. आज अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्या वरती अप्रत्यक्ष टीका करताना राज ठाकरे यांचा अत्यंत तीक्ष्ण शब्दात समाचार घेतला. कुत्री भुंकत असतात त्यांना भूक उद्या सिंहाचा (Lion) काम आहे शांतपणे निघून जाणे तुम्ही पण त्याच्यावरती हसत हसत निघून जा, अशा शब्दात अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तर दुसऱ्या बाजूला मी त्याच्यावर टीका काय करू मी त्याच्यावर टीका करावी तेवढी त्याची औकात नाही. माझा तर एक खासदार आहे. तर ते तर बेघर आहेत त्यांना तर घरातून काढून टाकले होते त्यांच्यावर मी काय बोलू अशाही शब्दात समाचार घेतला आहे.