अरविंद सावंत शेतकऱ्यांच्या बांधावर; म्हणाले, हे सरकार असंवेदनशील…

| Updated on: Apr 11, 2023 | 3:29 PM

Maharashtra Unseasonal Rain Loss : ठाकरेगटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी ते काय म्हणाले? पाहा...

अकोला : ठाकरेगटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून मला हे पाहून मनाला वेदना होत आहेत. अवंवेदशील आणि असंवैधनिक सरकार सध्या सत्तेत आहे. त्यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा करणार? पण शेतकरी सध्या संकटात आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. पंचनामे कधी पूर्ण होणार? शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकार कधी दखल घेणार? शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? सरकारने असं असंवेदनशीलपणे वागता कामा नये, असंही अरविंद सावंत म्हणाले.

Published on: Apr 11, 2023 03:27 PM
ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त पुण्यात अनोखा महोत्सव, बनवली तब्बल ५ हजार किलो मिसळ
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गोमुत्रधारी चंद्रकांत पाटील’, पण का?