अकोल्यात बाबजी महाराज मंदिर परिसरात मोठी दुर्घटना, झाड कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू

| Updated on: Apr 10, 2023 | 8:03 AM

Akola Unseasonal Rain : अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पाहा व्हीडिओ...

बाळापूर, अकोला : अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. बाळापूरमध्ये बाबाजी महाराज मंदिरातील शेडवर झाड कोसळलं. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झालाय. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कालच्या दुर्घटनेनंतर आज सकाळी बाबजी मंदिरात आरती करण्यात आली. काल रात्री झालेल्या आरतीच्या नंतर ही दुर्देवी घटना घडली होती. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पश्चिम विदर्भात 7 हजार हेक्टरवरच्या शेतपिकांचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे अमरावती, अकोला,यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात नुकसान झालंय. वादळी वारा आणि पावसामुळे घरांचीही पडझड झालीय. तर वाशिममध्ये पाच वानरांचा मृत्यू झालाय.

Published on: Apr 10, 2023 08:03 AM
सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही, असं म्हणणं हा ढोगीपणा; भाजप नेत्याची पवार यांच्यावर टीका
राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवरून आठवले यांची टोलेबाजी; म्हणाले…