Akola जिल्हा न्यायालयाकडून निधी गैरव्यवहार प्रकरणी Bachchu Kadu यांना जामीन मंजुर
न्यायालयाने यामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायाधीश यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पालकमंत्री कडू यांना जामीन मंजूर केला आहे.
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Guardian Minister Bachchu Kadu) यांच्यावर प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम 156 (3) नुसार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयाने आज निकाल देत पालकमंत्री कडू यांना जामीन मंजूर केला आहे. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे (Zilla Parishad Zilla Planning Committee) पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) केला होता. या प्रकरणी ही सुनावणी झाली. यात बच्चू कडू यांना जामीन मिळाला. त्यामुळं बच्चू कडू यांना दिलासा मिळाला आहे.