‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाचा बॉस अक्षय केळकर

| Updated on: Jan 09, 2023 | 7:43 AM

‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाने अखेर निरोप (८ जानेवारी) घेतला. यावेळी साताऱ्याचे किरण माने यांचा चांगलाच गाजावाजा झाला. तेच विजेते होतील अशी शक्यता ही होती. मात्र हा मान गेला तो अक्षय केळकर याला. आणि तो यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा ठरला.

मुंबई : मराठी सह हिंदी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’ कार्यक्रमाला सध्या चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तर ‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाचा निकाल लागला. त्याच्याआधी याचा कोण राजा होणार? कोण बॉस होणार? याचीच चर्चा रंगली होती. तर या चौथ्या पर्वात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ स्पर्धक होते.

बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाने अखेर निरोप (८ जानेवारी) घेतला. यावेळी साताऱ्याचे किरण माने यांचा चांगलाच गाजावाजा झाला. तेच विजेते होतील अशी शक्यता ही होती. मात्र हा मान गेला तो अक्षय केळकर याला. आणि तो यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा ठरला. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

यंदा बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ होते. यावेळी राखी सावंत आणि त्यापाठोपाठ अमृता धोंगडे यांची एक्झिट झाली. त्यानंतर अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक राहीले. त्यानंतर ज्यांचे नाव जास्त चर्चेत राहीले तेही किरण माने हे घराबाहेर पडले. शेवटी अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांच्यात झुंझ रंगली. त्यात अक्षय केळकर विजयी ठरला.

Published on: Jan 09, 2023 07:43 AM
राज ठाकरेंच्या कार्यक्रमात वसंत मोरेंना जागाच नाही!
हरियाणाच्या सोमवीरला आस्मान दाखवत अभिजीत कटकेने खेचून आणला हिंदकेसरी किताब