उद्धव ठाकरे खरं-खरं सांगा ते बंगले का पाडले? किरीट सोमय्या यांचा खरमरीत सवाल
अलिबागमध्ये 19 बंगले होते, असं रश्मी ठाकरे म्हणाल्याहोत्या. अॅग्रिमेंट केलं जर वर्षी त्याचा टॅक्स भरतात आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अचानक 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड नष्ट कसे काय केले? सरपंचावरती दबाव आणला. अशी लबाडी माजी मुख्यमंत्री करतात. त्याची महाराष्ट्राला लाज वाटते, असं सोमय्या म्हणालेत.
रेवदंडा, अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केलाय. बंगले का पाडले, असा प्रश्न त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेजी, अलिबागमधील बंगले का पाडले? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. हे बंगले कुठे गायब केले? कोणत्या हातोडाने पाडले? त्या संदर्भात माझं विस्तृत स्टेटमेंट मी पोलिसांना दिलं आहे. त्याचे पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, येत्या काही आठवड्यात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल, असं सोमय्या म्हणाले आहेत.
Published on: Mar 06, 2023 02:54 PM