भुसावळकरांसाठी मोठी बातमी; प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
सध्या भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तापी व पूर्णा नदीच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे.
भुसावळ, 23 जुलै 2023 | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर दिसत असल्याचे नद्यांच्या पात्रात देखील पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळत आहे. सध्या भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तापी व पूर्णा नदीच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवांधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असू धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. ज्यामुळे नदी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने सध्या १ लाख ३७ हजार ०९३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर धरणात सध्या ५१.३ टक्के भरले आहे.