Amravati : अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडले; वर्धा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
अमरावती जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग वाढल्याने वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अमरावती जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग वाढल्याने वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे कौडण्यापूर -आर्वी आणि मोर्शी -आष्टी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.
Published on: Aug 08, 2022 11:58 AM