Sachin Ahir on Cabinet | सगळी चांगली खाती भाजपच्या गोटात, सचिन अहिर यांनी ही साधला निशाणा

| Updated on: Aug 15, 2022 | 3:44 PM

Sachin Ahir on Cabinet | सगळी चांगली खाती भाजपच्या गोटात गेली आहे, शिंदे गटातील आमदारांच्या हाती फारशी चांगली खाती न लागल्याचा टोला शिवसेना नेते सचिन अहिर यांनी लगावला आहे.

Sachin Ahir on Cabinet | सगळी चांगली खाती (Ministry Allocation) भाजपच्या (BJP)गोटात गेली आहे, शिंदे गटातील आमदारांच्या हाती फारशी चांगली खाती न लागल्याचा टोला शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir )यांनी लगावला आहे. बंडखोर जेव्हा शिवसेनेत (Shivsena) होते, तेव्हा त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला. त्यांना चांगली खाती देण्यात आली. दादा भुसे यांची शेतीशी नाळ जोडलेली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी त्यांच्या सरकारमध्ये त्यांना कृषी खाते दिले होते. या खातेवाटपातून खरंच आपल्याला काय मिळाले, याचा अंदाज मंत्रिपद मिळालेल्या आमदारांना मिळालाच आहे. पण जे अद्यापही मंत्रिपदाची आस लावून बसलेले आहे, त्यांनी ते आता समजून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली उद्धव ठाकरे सरकार काम करत असल्याची टीका करणाऱ्यांनी भाजपच्या अजेंड्या खाली काम करायला सुरुवात केल्याचा टोला ही त्यांनी हाणला.

Published on: Aug 15, 2022 03:44 PM
Arvind Sawant | खातेवाटपात शिंदे गटाचा भ्रमनिरास, अरविंद सावंत यांचा शिंदे गटाला टोला
Dada Bhuse | मी मुख्यमंत्र्यांकडे वेगळ्या खात्याची मागणी केली होती, दादा भूसे यांनी केली नाराजी व्यक्त